लाल रंग : खाद्यपदार्थांवर लाल रंग असल्यास तो पदार्थ मांसाहार आहे असं सर्वासाधारण सगळ्यांना माहित आहे.
हिरवा रंग : हिरवा रंग खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर असल्यास संबंधित पदार्थ हा पूर्णत: शाकाहारी आहे, असा याचा अर्थ होतो.
पिवळा रंग: काही खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर पिवळ्या रंगाचं चिन्ह असतं. हा रंग असं सूचित करतो की, या पदार्थात अंड्याचा समावेश केला आहे. अनेकजण अंडी खात नाही, त्यामुळे ज्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवर पिवळा रंग आहे त्यात अंड्यांचा समावेश केलेला असतो.
निळा रंग: निळ्या रंगाचा अर्थ असा आहे की, संबंधित पदार्थ हा वैद्यकीय विभागाशी आधारित आहे. हे पदार्थ खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
काळा रंग: क्वचित असे खाद्यपदार्थांचे पॅकेट पाहायला मिळतात ज्याच्यावर काळ्य़ा रंगाचा समावेश असतो. काळ्या रंगाच्या चिन्हाचा अर्थ असा की, या पदार्थात रासायनिक घटकांचा समावेश मोठ्या प्रमाणात केलेला आहे. याचा तुमच्या आरोग्यास हानी होऊ शकते.