फक्त बदामच नाही तर या ड्रायफ्रुट्सच्या सेवनाने मेंदू होतो तल्लख
अक्रोड - यामध्ये आमेगा-३, फॅटी अॅसिड असतात, जे मेंदूच्या पेशींना सक्रिय ठेवण्यास मदत करतात.
काजू - काजूचे सेवन शरीरात जस्त आणि लोहाचे प्रमाण भरुन काढते ज्यामुळे आपला मेंदू तीक्ष्ण होण्यास मदत होते.
पिस्ता - हिरवागार पिस्ता व्हिटॅमिन बी६ ने समृद्ध असतो, यामुळे मेंदूतील रसायने संतुलित राखली जातात.
मणुका - गोड मणुका मेंदूला ऊर्जा प्रदान करण्याचे काम करतो, यामुळे लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.
वाळवलेले अंजीर - वाळवलेल्या अंजीरांमध्ये असे काही अँटीऑक्सिडंट्स आढळले जातात जे स्मरणशक्ती सुधारतात.