मकरसंक्रांतीला केवळ खिचडीच नाहीतर घरी बनवा 'हे' स्वादिष्ट पदार्थ
महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ म्हणजे पुरणपोळी. दूध किंवा तुपासोबत पुरणपोळी हा पदार्थ खाल्ला जातो. तूरडाळ आणि गुळाचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.
गुजरातमधील प्रसिद्ध "उंधियू"मकर संक्रांतीच्या दिवशी बनवला जातो. त्यात हंगामी भाज्या आणि वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर पदार्थांची चव वाढवण्यासाठी करतात.
थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर गाजर उपलब्ध असतात. त्यामुळे प्रत्येक घरात गाजर हलवा कायमच बनवला जातो. दूध आणि सुका मेवा टाकून बनवलेला गाजर हलवा सगळ्यांचा फेव्हरेट आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध मुरमुऱ्यांचे लाडू चवीला अतिशय सुंदर लागतात.कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे लाडू इतर कोणत्याही दिवशी तुम्ही खाऊ शकता.
बंगालमध्ये संक्रांतीच्या वेळी "पिठा" बनवण्याची परंपरा आहे. तांदळाच्या पिठापासून बनवलेला गोड पदार्थ नारळ आणि खजूराच्या गुळाने भरलेला असतो. पारंपरिक पदार्थ सणांचा गोडवा वाढवतात.