
उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट
वाढत्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवणे फार आवश्यक आहे. कारण कडक उन्हात बाहेर जाऊन आल्यानंतर शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊन जाते. अशावेळी थकवा, अशक्तपणा वाढू लागतात. शरीरात वाढलेल्या अशक्तपणामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीर थंड ठेवण्यासाठी थंड ताक, दही, सरबत इत्यादी पदार्थ प्यावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही भात बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ ऑफिसच्या डब्यासाठी किंवा लहान मुलांसाठी सुद्धा बनवू शकता. दहीभात हा पदार्थ १० मिनिटांमध्ये लगेच तयार होतो. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारे पदार्थ खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. दह्यामधील चांगले बॅक्टेरिया पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत करतात. दिवसभर शरीर हायड्रेट आणि फ्रेश ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. पण दही केवळ दुपारच्या आहारातच खावे. संध्याकाळच्या वेळी दही भात खाल्ल्यास पचनाच्या समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. चला तर जाणून घेऊया दहीभात बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)
Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड