केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी हेअर स्टाईल केल्यानंतर वेगवेगळ्या फुलांचा गजरा किंवा फुले केसांमध्ये घातली जातात. नऊवारी साडी, पारंपरिक पोशाख किंवा कोणताही ड्रेस घातल्यानंतर मुलींना केसात गजरा हवा असतो. गजऱ्याशिवाय लुक पूर्ण होत नाही. पण गजरा नीट न माळल्यास हेअर स्टाईल खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे या पद्धतीने हेअर स्टाईल करून केसांमध्ये गजरा घालू शकता. कोणत्याही फुलांचा गजरा घातल्यास लुक पूर्ण होईल आणि केस सुद्धा सुंदर दिसतील. (फोटो सौजन्य – pinterest)
नऊवारीपासून साडीपर्यंत परफेक्ट! केसांमध्ये गजरा माळण्याच्या सुंदर आणि स्टायलिश पद्धती

पारंपरिक साडी नेसल्यानंतर किंवा लांब केसांमध्ये या पद्धतीने गजरा माळल्यास केस अतिशय खुलून दिसतील. पांढऱ्या आणि केशरी फुलांची रंगसंगीती गणपती उत्सवात सुंदर दिसेल.

अनेकांना वेणी हेअर स्टाईल खूप जास्त आवडते. वेणी हेअर स्टाईल केल्यानंतर या पद्धतीने भरगच्च गजरे लावल्यास तुमचा लुक इतरांपेक्षा हटके आणि सुंदर दिसेल.

युनिक हेअर स्टाईल हवी असल्यास बन बांधून या पद्धतीने केसांमध्ये गजरा माळवा. यामुळे केसांचा आकार आणि ताजेपणा अधिककाळ व्यवस्थित टिकून राहतो.

कांजीवरम सिल्क किंवा बनारसी साडी नेसल्यानंतर बन हेअर स्टाईल करून अंबाड्याभोवती भरगच्च मोगऱ्याच्या फुलांचा गजरा लावावा.

केसांमध्ये गजरा घालताना तो कधीच घट्ट दाबू नये. यामुळे केसांना इजा पोहचते. गजरा कायमच पिन किंवा केसांमध्ये अडकवून लावावा. शॉर्ट केसांमध्ये या पद्धतीने गजरा लावल्यास केस उठावदार दिसतील.






