आशिया कपसाठी सराव करतानाचे भारतीय खेळाडूंचे काही फोटो. फोटो सौजन्य - सोशल मिडिया (indian cricket team)
भारताचा युवा खेळाडू अभिषेक शर्मा हा संघामध्ये पुनरागमन करेल आणि आता तो भारताच्या संघाला कशी सुरुवात करून देईल हे पाहणे मनोरंजक ठरेल. संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया (indiancricketteam)
टीम इंडिया सूर्यकुमार यादवचे नेतृत्वाखाली सध्या t20 क्रिकेट खेळत आहे. पण पाकिस्तान विरुद्ध सूर्याचे आकडे फार काही चांगले नाहीत. पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारताचा उपकर्णधार शुभमन गिल याच्याकडे सुद्धा टीम इंडियाच्या चाहत्यांचे लक्ष्य असणार आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया (indian cricket team)
विश्वचषकानंतर भारताचे दोन दमदार खेळाडू अक्षर पटेल आणि शिवम दुबे हे दोघेही आता संघामध्ये पुनरागमन करतील. त्याचबरोबर जितेश शर्माचे देखील भारतीय संघात पुनरागमन होणार आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया (indiancricketteam)
भारताची फिरकी गोलंदाजांची जोडी कुलदीप यादव आणि वरून चक्रवर्ती या दोघांच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे. वरून चक्रवर्तीने भारतीय संघासाठी मागील एक वर्षात कौतुकास्पद कामगिरी केली आहे त्यामुळे आता त्याच्याकडे लक्ष असणार आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया (indiancricketteam)
तिलक वर्माचे भारतीय संघामध्ये पुनरागमन होणार आहे त्याचबरोबर रिंकू सिंग याला देखील टीम इंडिया स्थान मिळाले आहे. रिंकू सिंगच्या आयपीएल मधील खराब कामगिरीनंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. फोटो सौजन्य - सोशल मिडिया (indiancricketteam)
भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याला कसोटी क्रिकेटच्या संघामध्ये संधी मिळाली होती पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नव्हते. विश्वचषकानंतर तो पहिल्यांदाच आता भारतीय संघामध्ये खेळताना दिसणार आहे. हर्षित राणा देखील भारतीय संघासाठी खेळताना दिसेल. फोटो सौजन्य - सोशल मिडिया (indiancricketteam)
भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे t20 क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार आहे त्याचबरोबर हार्दिक पांड्या हा त्याच्या नव्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. फोटो सौजन्य - सोशल मिडिया (indiancricketteam)