मराठी सिनेसृष्टीत सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे प्रिया बापट
अभिनेत्री प्रिया बापटचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. महेश मांजरेकर यांच्या 'काकस्पर्श' आणि 'आम्ही दोघी' या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अभिनेत्रीची एकूण संपत्ती १८ ते २० कोटी रुपये आहे आणि ती प्रत्येक चित्रपटासाठी ८ लाख रुपये घेते.
तसेच, प्रिया बापट आता लवकरच 'बिन लग्नाची गोष्ट' या नव्याकोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. म्हणजे या सिनेमात प्रिया बापट आणि उमेश कामत या सिनेमाच्या माध्यमातून बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा चित्रपट येत्या १२ सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे.
प्रिया बापट मराठीसोबतच हिंदी, OTT प्लॅटफॉर्मवरही स्वतःच्या अभिनयाच्या कौशल्य दाखवत आहे. प्रिया बापट हे बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये एक प्रसिद्ध नाव आहे. २०२३ मध्ये तिने राजकुमार हिरानी दिग्दर्शित मुन्ना भाई एमबीबीएस या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
प्रिया बापट मुंबईतील दादर रानडे रोडवरील एका चाळीत राहिलेली अभिनेत्री आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने खुलासा केला की तिने २५ वर्षे एका चाळीत घालवली आहेत.. लग्नानंतर तिने तिची चाळी सोडली.
अभिनेत्रीचा पती अभिनेता उमेश कामत आहे. दोघेही २०११ मध्ये लग्नबंधनात अडकले आणि ते मराठी नाटक 'नवा गाडी नवा राजा' मध्येही एकत्र काम करताना दिसले. दोघांची जोडी देखील प्रेक्षकांना खूप आवडते.