(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये प्रियांका चोप्रा आकाशी निळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. ज्यासोबत प्रियांका चोप्राने एक सुंदर हिऱ्याचा हार घातला आहे.
नीलम उपाध्याय लग्नस्थळी प्रवेश करताच प्रियांका चोप्रा देखील तिच्या मागे आली. सुरुवातीला, प्रियांका चोप्रा तिच्या होणाऱ्या वाहिनीचा लेहंगा वैवस्थित करताना दिसली. एवढेच नाही तर स्टेजवर चढताना प्रियांका चोप्राने तिच्या वाहिनीचा हात धरला होता.
प्रियांका चोप्राने तिच्या भावाला कोणताही त्रास होऊ दिला नाही. प्रियांका चोप्राची ही स्टाईल पाहून चाहते थक्क झाले आहेत. चाहते प्रियांका चोप्राला जगातील सर्वोत्तम नणंद म्हणून टॅग करत आहेत. लग्नात आलेले पाहुणे फक्त प्रियांका चोप्राकडे पाहत होते.
नीलम उपाध्यायच्या ब्राइडल लूक देखील पाहल्यासारखा होता. तिने तिच्या लग्नाच्या दिवशी एक चमकदार लाल लेहंगा परिधान केला होता. ज्यामध्ये तिने सोन्याचे दागिने घातले होते. चाहते नीलम उपाध्यायच्या ब्राइडल लूकवरून नजर हटवू शकत नाहीत.
तसेच नवरदेव सिद्धार्थ चोप्राने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा परिधान केला होता. तसेच त्याचा लूक देखील चाहत्यांना खूप आवडला. या दोघांची जोडी खूपच छान दिसत आहे.