25 फेब्रुवारी 2026 रोजी अभिनेत्री रश्मीका आणि विजय डेव्हरकोंडा यांचा हळदी समारंभ अतिशय उत्साहात पार पडला. त्यांचे लग्न उदयपूर येथे अतिशय थाटात झाले. त्यांनी त्यांच्या लग्नाला विरोशचे लग्न असे नाव दिले तसेच चाहत्यांना भरपूर धन्यवादी दिले. अभिनेत्री रश्मीकाने तिच्या सोशल मीडियावर त्यांच्या हळदी समारंभाचे काही दृश्य शेअर केले आहेत.
रश्मीका विजयची हळद. (फोटो सौजन्य - Social Media )

तिने पोस्टखाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "साखरपुडा आणि संगीत समारंभ उशिरापर्यंत चालूनही दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीय आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याचा उत्साह वेगळाच होता.

हा हळदी समारंभ Mementos by ITC Hotels येथे पार पडला. सुमारे 200 एकर परिसरात पसरलेल्या या निसर्गरम्य ठिकाणाचे तिने विशेष कौतुक केले. नदी, डोंगर, बागा आणि खुल्या जागेमुळे हा अनुभव आणखी खास झाल्याचे तिने म्हटले.

हळदीच्या कार्यक्रमात पाणी, रंग, संगीत आणि धमाल मस्तीचा माहोल होता. मजेशीर ‘हळदी वॉर’मध्ये सहभागी होताना सर्वांच्या कपड्यांवर हळद आणि रंग लागले, त्यामुळे अनेकांचे कपडे खराब झाले.

या कार्यक्रमासाठी खास डेकोरेशन करण्यात आले होते. मोठ्या उर्लीत संपूर्ण मित्रमंडळी एकत्र बसू शकतील अशी कल्पना तिने मांडली होती, जी डेकोर टीमने प्रत्यक्षात उतरवली.

हा अनुभव इतका आवडला की दरवर्षी फेब्रुवारीमध्ये कुटुंबीय आणि मित्रांसोबत येथे सुट्टीसाठी परत यावे, असा विचारही तिने व्यक्त केला...






