दैनंदिन आहारात नियमित एक किंवा दोन केळी खाण्याचा सल्ला कायमच दिला जातो. केळी खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. पिवळ्या रंगाची पिकलेली केळी चवीला अतिशय गोड असतात. पण तुम्ही कधी लाल रंगाची केळी पहिली आहेत. पिवळ्या रंगाच्या केळ्यांपेक्षा लाल रंगाची केळी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर मानली जातात. पिवळ्या रंगाची केळी खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि गोड पदार्थ खाण्याची जास्त इच्छा होत नाही. चला तर जाणून घेऊया लाल रंगाची केळी खाल्ल्यामुळे शरीराला होणारे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
पिवळ्या रंगांच्या केळ्यांपेक्षा लाल केळी जास्त गुणकारी! रोजच्या आहारात नियमित करा सेवन, राहाल कायम फिट

लाल रंगची केळी प्रामुख्याने ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, मेक्सिको आणि अमेरिका या देशांमध्ये पिकवली जातात. या देशांमध्ये लाल केळ्यांना खूप जास्त मागणी आहे. भारतातसुद्धा लाल रंगाच्या केळीची लागवड केली जात आहे.

लाल रंगाच्या केळींमध्ये कॅरोटेनॉइड्स,विटामिन सी आणि अँथोसायनिन सारखे गुणकारी घटक आढळून येतात. शरीरातील पेशींचे नुकसान होऊ नये म्हणून आहारात लाल केळीचा समावेश करावा.

विटामिन ए आणि कॅरोटेनॉइड्सने समृद्ध असलेली लाल केळी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहेत. डोळ्यांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी लाल केळी खावी.

उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी लाल केळी खाल्ली जातात. यामध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम रक्तवाहिन्यांवर जास्त दबाव निर्माण करत नाही.

पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि बद्धकोष्ठतेच्या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी आहारात लाल केळ्यांचा समावेश करावा.






