सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी नियमित करा मेथीच्या पाण्याचे सेवन
जगभरात अनेक रुग्ण मधुमेहाने त्रस्त आहेत. मधुमेह झाल्यानंतर तो कधीच बरा होत नाही. त्यामुळे मधुमेह झाल्यानंतर खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये पथ्य पाळणे अतिशय महत्वाचे आहे. यावर उपाय म्हणून तुम्ही नियमित मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन करू शकता. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होईल.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक लोक आहारतज्ञांकडून डाईट, प्रोटीनशेक घेतात. मात्र याचा फारसा परिणाम शरीरावर दिसून येत नाही. अशावेळी आहारात मेथी दाण्यांचे सेवन करावे. या पाण्याच्या सेवनामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी होऊन लठ्ठपणाची समस्या कमी होते.
मेथी दाण्यांमध्ये आढळून येणारे फायबर शरीराची पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. बद्धकोष्ठता,गॅस, आम्लता आणि आम्ल्पिताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी मेथी दाण्याचे पाणी उपाशी पोटी नियमित प्यावे.
शरीरात वाढलेली खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि हानिकारक कोलेस्ट्रॉल कमी होते. मेथीचे पाणी नियमित प्यायल्यामुळे हृदयविकाराचा धोका टळतो.
मेथी दाणे त्वचेसाठी अतिशय प्रभावी ठरतात. अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म त्वचा स्वच्छ आणि चमकदार करण्यासाठी मदत करतात. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि यामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होऊन त्वचा सुंदर दिसू लागते.