दैनंदिन आहारात नियमित करा रताळ्याचे सेवन
गोड रताळ्यांमध्ये बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात आढळून येते. या विटामिनचे रूपांतर नंतर विटामिन ए मध्ये होते. विटामिन ए शरीरासाठी अतिशय महत्वाचे आहे. यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते, त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
रताळ्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी रोजच्या आहारात रताळ खावं. यामुळे पचनासंबंधित कोणतीही समस्या उद्भवत नाही.
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात अनेक बदल. या बदलांकडे दुर्लक्ष न करता आहारात रताळ्याचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होईल.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात रताळी खावी. रताळं खाल्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते. सकाळच्या नाश्त्यात रताळी खाल्यास वजन नियंत्रणात राहते.
रताळ्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवण्यासाठी मदत करतात. शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी नियमित रताळी खावी.