चेहऱ्यावरील सर्वच समस्यांसाठी प्रभावी ठरेल गुलाब पाणी
सतत फेसवॉश किंवा स्किन केअर प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचा अतिशय कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. अशावेळी त्वचेची काळजी घेण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. गुलाब पाण्याच्या वापरामुळे त्वचा हायड्रेट राहते. तसेच त्वचेवर मऊपणा वाढण्यास मदत होते.
पिगमेंटेशन किंवा पिंपल्समुळे खराब झालेली त्वचा सुधारण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर टोनर म्हणून करावा. यामुळे काळे डाग कमी होतात.
गुलाब पाण्यात अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात. यामुळे डोळ्यांभोवती आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते. याशिवाय फेसपॅक किंवा फेसमास्क तयार करताना गुलाब पाण्याचा वापर करावा.
वाढत्या वयात चेहऱ्यावर आलेल्या सुरकुत्या कमी करण्यासाठी गुलाब पाण्याचा वापर करावा. गुलाब पाण्यात असलेल्या गुणधर्मांमुळे त्वचेच्या सर्वच समस्यांपासून सुटका मिळते.
गुलाब पाण्याचा वापर करताना सर्वप्रथम, कापसाच्या गोळ्यावर गुलाब पाणी घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर लावावे. यामुळे चा स्वच्छ होते आणि त्वचेमधील घट्टपणा कायम टिकून राहतो.