Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ आहेत रॉयल एनफिल्डच्या इतिहासातील टॉप 5 लिमिटेड एडिशन बाईक्स! काही मिनिटांतच कश्या विकल्या गेल्या यांच्या प्रत्येक बाईक?

रॉयल एनफिल्ड म्हणजे केवळ एक मोटारसायकल नाही, तर तो एक जिवंत वारसा आणि संस्कृती आहे. बुलेटप्रेमींसाठी या ब्रँडची क्रेझ काही वेगळीच आहे. पण जेव्हा रॉयल एनफिल्ड आपली एखादी 'लिमिटेड एडिशन' बाईक बाजारात आणते, तेव्हा जगभरातील बाईक कलेक्टर्स आणि रायडर्समध्ये ती खरेदी करण्यासाठी झुंबड उडते. अत्यंत मर्यादित संख्येत तयार केलेल्या या बाईक्स काही मिनिटांतच विकल्या जातात. रॉयल एनफिल्डने आतापर्यंत लाँच केलेल्या काही अत्यंत लोकप्रिय लिमिटेड एडिशन बाईक्स आणि त्यांची एकूण संख्या काही अशी आहे,

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 20, 2026 | 07:16 PM
Follow Us
Follow Us:
1 / 5

रॉयल एनफिल्ड क्लासिक ५०० 'पेगासस' एडिशन (Classic 500 Pegasus) दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सैन्यासाठी वापरल्या गेलेल्या ऐतिहासिक 'फ्लाईंग फ्ली' या हलक्या बाईकवरून ही प्रेरित होती. लष्करी रंगाचे फिनिशिंग, कॅनव्हास सॅडलबॅग्ज आणि टाकीवर असलेला पेगाससचा ऐतिहासिक लोगो ही याची वैशिष्ट्ये होती. कलेक्टर्ससाठी जगभरात याचे १,००० युनिट्स तयार करण्यात आले होते, ज्यापैकी भारतासाठी केवळ २५० युनिट्स दिले गेले.

2 / 5

रॉयल एनफिल्ड ६५० ट्विन्स '१२०th ॲनिव्हर्सरी' एडिशन (650 Twins 120th Anniversary) रॉयल एनफिल्डच्या गौरवशाली प्रवासाला १२० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल २०२१ मध्ये ही खास एडिशन लाँच केली गेली. यात इंटरसेप्टर ६५० आणि कॉन्टिनेंटल जीटी ६५० या दोन्ही मॉडेल्सचा समावेश होता. पूर्णपणे ब्लॅक-क्रोम थीम आणि तमिळनाडूतील कुंभकोणम येथील प्रसिद्ध कारागिरांनी हाताने बनवलेला पितळाचा टँक बॅज ही याची खासियत होती. या बाईकचे जगभरात फक्त ४८० युनिट्स (भारतात १२० युनिट्स) बनवले गेले होते.

3 / 5

रॉयल एनफिल्ड क्लासिक ५०० 'डिस्पॅच' एडिशन (Classic 500 Despatch) पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात युद्धाच्या मैदानात महत्त्वाचे संदेश पोहोचवणाऱ्या 'डिस्पॅच रायडर्स'च्या सन्मानार्थ २०१५ मध्ये ही बाईक आणली गेली. 'हायड्रोग्राफिक प्रिंट ट्रान्सफर' तंत्रज्ञानाचा वापर करून यावर हाताने कॅमफ्लाज (लष्करी छावणीसारखी) पेंट स्कीम केली होती. त्यामुळे कोणत्याही दोन बाईक्सची डिझाईन सारखी नव्हती. यात स्क्वॉड्रन ब्लू आणि डिझर्ट स्टॉर्म अशा दोन रंगांचे प्रत्येकी २०० युनिट्स तयार केले गेले होते.

4 / 5

रॉयल एनफिल्ड क्लासिक ५०० 'ट्रिब्यूट ब्लैक' (Classic 500 Tribute Black) रॉयल एनफिल्डचे आयकॉनिक ५०० सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन अधिकृतपणे बंद करताना, या इंजिनला निरोप देण्यासाठी २०२० मध्ये ही शेवटची ५०० सीसी एडिशन लाँच केली गेली. मॅट आणि ग्लॉस ब्लॅकच्या अप्रतिम कॉम्बिनेशनवर रॉयल एनफिल्डची पारंपरिक सोनेरी रंगाची पिन-स्ट्रिपिंग (हाताने मारलेल्या रेषा) यात देण्यात आली होती. ही बाईक देखील साधारण १,००० युनिट्सच्या अत्यंत मर्यादित संख्येत आणली गेली होती.

5 / 5

रॉयल एनफिल्ड शॉटगन ६५० x 'रफ क्राफ्ट्स' एडिशन (Shotgun 650 x Rough Crafts) तैवानमधील जगप्रसिद्ध कस्टम मोटरसायकल बिल्डर 'रफ क्राफ्ट्स' सोबत भागीदारी करून २०२६ च्या जुलै महिन्यात ही अत्यंत आधुनिक आणि प्रीमियम लिमिटेड एडिशन सादर करण्यात आली आहे. ग्लॉस जेट ब्लॅक रंग, हाताने फिनिशिंग केलेले 'गोल्ड लीफ' पट्टे आणि कल्ट डिझायनर विन्स्टन येह यांचे आर्टवर्क या बाईकवर पाहायला मिळते. जागतिक स्तरावर ही अत्यंत दुर्मिळ असून याचे केवळ १०० युनिट्स तयार करण्यात आले आहेत, ज्यातील फक्त २५ युनिट्स भारताच्या वाट्याला आले आहेत.

Web Title: Royal enfield top five limited edition bikes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • automobile
  • royal enfield

संबंधित बातम्या

पुण्यात हिंजवडीत ब्रिजस्टोनचे नवीन सिलेक्ट स्टोअर सुरू! आता ग्राहकांना मिळणार प्रीमियम टायर आणि सेवा
1

पुण्यात हिंजवडीत ब्रिजस्टोनचे नवीन सिलेक्ट स्टोअर सुरू! आता ग्राहकांना मिळणार प्रीमियम टायर आणि सेवा

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ
2

इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये तेजी; ऑगस्टमध्ये चेतकची आघाडी, विक्रीत 146% वाढ

मध्य प्रदेशमध्ये 7,400 हून जास्त गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूटर; इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ₹1.20 लाखांची मदत
3

मध्य प्रदेशमध्ये 7,400 हून जास्त गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूटर; इलेक्ट्रिक स्कूटरसाठी ₹1.20 लाखांची मदत

TVS Ntorq 150 ची किंमत आणि EMI किती? 150cc स्कूटर घेण्याआधी जाणून घ्या खर्च आणि माहिती
4

TVS Ntorq 150 ची किंमत आणि EMI किती? 150cc स्कूटर घेण्याआधी जाणून घ्या खर्च आणि माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.