अर्थमंत्री Nirmala Sitharaman यांनी २०२१ ते २०२५ दरम्यान नेसलेल्या साड्यांचे बजेटशी खास कनेक्शन
२०२५-२६ चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी माशांच्या थीमवर भरतकाम केलेली आणि सोनेरी बॉर्डर असलेली ऑफ-व्हाइट हँडलूम सिल्क साडी नेसली होती. हातमागावर विणण्यात आलेल्या मधुबनी कलेला आदरांजली दिली.
२०२४ चा अर्थ संकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी किरमिजी रंगाची बॉर्डर असलेली रेशमी मंगलगिरी साडी परिधान केली होती. ही साडी आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील मंगलगिरी शहरात तयार केली जाते. या अर्थसंकल्पादरम्यान, आंध्र प्रदेशसाठी विशेष आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण २०२३ चा अर्थसंकल्प सादर करताना काळ्या रंगाची बॉर्डर असलेली लाल साडी परिधान केली होती. त्यांनी नेसलेल्या साडीवर मंदिराच्या कलाकृतीची डिझाईन होती. हातमागावरील साडी कर्नाटकात तयार करण्यात आली होती.
२०२२ मध्ये अर्थमंत्र्यांनी तपकिरी रंगाची बोमकाई साडी नेसली होती. ही साडी पूर्व भारतातील ओडिशा राज्यात बनवली जाते. याशिवाय साडीवर चंदेरी जरीचा वापर करण्यात आला आहे. ८ व्या शतकात ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात सोनेपुरी साडी तयार करण्यात आली होती. त्यानंतर बोमकाई साड्यांना २०१२ मध्ये जीआय टॅग मिळाला.
२०२१ चा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी लाल आणि ऑफ व्हाईट रंगाची सिल्क पोचमपल्ली साडी परिधान केली होती. साडीच्या पदरावर गुंतागुंतीचे इकत नक्षीकाम करण्यात आले होते. "व्होकल फॉर लोकल" मोहिमेला उजागर करण्यासाठी पारंपारिक हातमाग साडीची निवड करण्यात आली होती. २००५ मध्ये तिला भौगोलिक संकेत (GI) टॅग मिळाला.