पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये अश्विनी चवरेचा बार्बी लूक व्हायरल, अभिनेत्रीच्या फॅशन अन् ग्लॅमरची चर्चा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
२०२५ हे वर्ष अश्विनीसाठी खूप खास आहे. कारण या वर्षात अश्विनीची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली, नेहमीच अभिनय आणि अप्रतिम फोटो शूटमुळे आठवणीत राहणाऱ्या या अभिनेत्रीच्या आता आणखी एका फोटोशूटने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
अश्विनीने पांढऱ्या शुभ्र मिनी ड्रेसमध्ये काही खास फोटो शेअर केले आहेत. या ड्रेसबरोबरच अभिनेत्रीचे कुरळे मोकळे सोडलेले केस आणि त्यात अडकवलेली पांढरी फुलं तिच्या लूकमध्ये भर घालत आहेत.
इतकंच नाही तर या खास लूकसाठी वापरलेल्या अश्विनीच्या हातातील नाजूक अशा मोत्याच्या ब्रेसलेटची अधिक चर्चा झाली. तिच्या या फोटोला चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
सध्या अश्विनीच्या मादक, मनमोहक पोज देत काढलेल्या या फोटोशूटने हवा केली आहे. या फोटोशूटमधून अश्विनीची निरागसता अधिक भावली. शिवाय या फोटोशूटमध्ये अश्विनीचा आत्मविश्वास, शैली आणि सौंदर्य यांची उत्तम छटा अनुभवायला मिळत आहे.
कॅमेऱ्यात कैद झालेले हे खास फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून चाहत्यांकडून भरभरुन प्रतिक्रिया मिळत आहेत. या फोटोंमुळे चर्चेत आलेली अश्विनी आता आगामी कोणत्या चित्रपटांमध्ये दिसणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.