Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदा गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय! श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी मानले रेल्वे मंत्र्यांचे आभार

गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडण्यात याव्या अशी मागणी खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्र्यांकडे केली होती. हीच मागणी लक्षात घेत रेल्वे मंत्र्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 22, 2025 | 09:09 PM
गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय!

गणेशोत्सवासाठी ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय!

Follow Us
Close
Follow Us:

कोकणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवासाठी जादा रेल्वे गाड्या सोडाव्यात यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसेच कोकणातील महायुतीचे सर्व खासदार यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती. सातत्याने होत असलेल्या मागण्यांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या आणि विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल दोन्ही खासदारांनी सर्व खासदारांच्या वतीने रेल्वे मंत्रींचे विशेष आभार मानले.

गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण आहे. मुंबईसह देशभरात नोकरी-व्यवसाय करणारे कोकणवासी दरवर्षी या उत्सवाच्या निमित्ताने गावी परतण्याची आतुरतेने वाट पाहतात. घराघरात बाप्पा येतो, गावागावात मंगलमय वातावरण निर्माण होते. मात्र या उत्साहात चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाशी संवाद साधून अनेक सूचना केल्या. विशेष म्हणजे त्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून त्यांची अंमलबजावणी रेल्वे प्रशासनाने सुरू केली आहे.

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील गणेश मंडळांचा ‘हा’ वाद अखेर मिटला; मंत्री मोहोळांच्या पुढाकराने सुटला प्रश्न

यावर्षी कोकण रेल्वेने मध्य, पश्चिम व दक्षिण रेल्वेसोबत समन्वय साधून तब्बल ३६६ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई, पनवेल, वडोदरा, बेंगळुरू, रत्नागिरी, कुडाळ, सावंतवाडी व मडगाव येथून चाकरमान्यांना गावी जाणे अधिक सोयीस्कर होणार आहे. प्रवाशांच्या आरोग्य सुरक्षेसाठी २५ ऑगस्टपासून खेड, माणगाव, चिपळूण, कणकवली, कुडाळ व सावंतवाडी रोड येथे पॅरामेडिकल कर्मचारी तैनात राहतील. चिपळूण व रत्नागिरीतील आरोग्य केंद्रात २४ तास डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपलब्ध असतील तर आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका तत्पर असतील, अशी माहिती खासदार म्हस्के यांनी दिली.

प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, विशेष तिकिट रांगा, प्री-प्रिंटेड तिकिटे, यात्री सहायता केंद्रे आणि एसटी बसची सोय करण्यात आली आहे. गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी विशेष तपासणी, सीसीटीव्ही निगराणी, RPF व स्थानिक पोलिसांचा समन्वय करण्यात आला आहे. तसेच स्थानकांची स्वच्छता, आकर्षक सजावट, विशेष प्रकाशयोजना, रांगोळ्या, पूजा साहित्य व मिठाई स्टॉल्स, संगीत-कलासादरीकरण आणि सेल्फी पॉइंट्स या माध्यमातून प्रवासालाही उत्सवी रंग देण्यात आला आहे.

Vote चोरीचे प्रकरण काँग्रेसवरच पलटणार? चव्हाणांच्या कुटुंबियांनी दुबार-तिबार मतदान केलं? भाजपचा गंभीर आरोप

सातत्याने गणेशभक्तांसाठी मांडलेल्या मागण्या गांभीर्याने स्वीकारून रेल्वे प्रशासनाने या योजना राबवल्याबद्दल श्रीकांत शिंदे व नरेश म्हस्के यांनी रेल्वे मंत्रींचे आभार मानले आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर, सुरक्षित व आनंददायी व्हावा आणि त्यांच्या घरी बाप्पाचे आगमन सुख-समाधान घेऊन यावे, अशी प्रार्थना नरेश म्हस्के यांनी केली.

Web Title: Ganeshotsav 2025 shrikant shinde naresh mhaske thanked railway minister for 366 special trains to konkan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 09:09 PM

Topics:  

  • ganeshostav
  • Marathi News
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: अकोले बस डेपो बंद केल्यास आंदोलन करणार! विकास क्रांती सेनेचा इशारा
1

Ahilyanagar News: अकोले बस डेपो बंद केल्यास आंदोलन करणार! विकास क्रांती सेनेचा इशारा

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!
2

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Raigad :  पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात
3

Raigad : पायाखालची वाळू सरकल्याने विरोधकांचे अफवा पसरवण्याचे काम सुरु; नरेश पाटील यांचा घणाघात

तीन भावांचा निरागस जल्लोष… ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या पसंतीस!
4

तीन भावांचा निरागस जल्लोष… ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चं धमाकेदार प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या पसंतीस!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.