Dagdusheth Halwai Ganpati mandir shahale mohotsav pune news
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये शहाळे महोत्सव करण्यात आला आहे.
वैशाख पौर्णिमेच्या पवित्र दिवशी श्री गणेशाचा पुष्टिपती विनायक हा अवतार झाला होता. भारतीय संस्कृतीमध्ये वैशाख पौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे. यानिमित्ताने शहाळे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
वैशाख वणव्यापासून रक्षण व्हावे. दुष्काळ, पाण्याचे दुर्भिक्ष शेतक-यांच्या समस्या गणरायाच्या कृपेने निर्विघ्न व्हाव्यात, या भावनेने शहाळ्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला आहे.
या शहाळे महोत्सवामध्ये तब्बल 5 हजार शहाळेंचा महानैवद्य अर्पण करण्यात आला आहे. मंदिरातील गाभाऱ्यासह श्रींच्या मूर्तीपुढे शहाळ्यांची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे.
त्याचबरोबर मंदिराच्या सभामंडप आणि बाहेरील बाजूस देखील शहाळ्यांची आकर्षक आरास करण्यात आली आहे.
दुस-या दिवशी ससून रुग्णालयातील रुग्णांना शहाळ्यांचा प्रसाद देण्यात येणार आहे, असेही ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.