त्वचा आणि केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर! दैनंदिन आहारात करा 'या' मसाल्यांचे सेवन
मागील अनेक वर्षांपासून आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या हळदीचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जात आहे. हळद पदार्थांची चव वाढवण्यासोबतच रंग सुद्धा वाढवते. यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.
दालचिनीच्या सेवनामुळे शरीराचे रक्तभिसरण सुधारण्यास मदत होते. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास पाणी गरम करून त्यात दालचिनी टाकून उकळवून घ्या. तयार केलेले पाणी उपाशी पोटी प्यायल्यास शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील.
लवंगमध्ये अँटीमायक्रोबियल आणि अँटीफंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. ज्यामुळे त्वचा आणि केसांवरील टाळूच्या समस्येपासून आराम मिळतो. केसांमध्ये वाढलेला कोंडा कमी करण्यासाठी लवंग तेलाचा वापर करावा.
मेथी दाणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. सकाळी उठल्यानंतर नियमित उपाशी पोटी मेथी दाण्यांच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल आणि आरोग्य सुधारेल.
किमतीने महाग असलेल्या केशराचा वापर आरोग्यासाठी केला जातो. दुधात किंवा पाण्यात मिक्स करून सुद्धा तुम्ही केशरचे सेवन करू शकता. केशर खाल्ल्यामुळे त्वचा उजळदार होते.