
Esim Vs Isim: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आपण कित्येक वर्षांपासून मोबाईलमध्ये ते छोटंसं प्लास्टिकचं SIM कार्ड वापरतोय. कधी ते कापावं लागतं, कधी पिनने ट्रे उघडावा लागतो. पण आता हा सगळा त्रास संपणार आहे. मोबाईलच्या दुनियेत सगळ्यात मोठा बदल होतोय. आता फिजिकल सिम कार्ड हद्दपार होणार असून त्याची जागा eSIM आणि iSIM हे नवीन तंत्रज्ञान घेणार आहे.
यामुळे तुमचा मोबाईल वापरण्याचा अनुभवच पूर्ण बदलून जाणार आहे. पुढच्या काळात येणारे फोन फक्त SIM-less असणार नाहीत, तर ते आत्तापेक्षा जास्त सुरक्षित आणि फास्ट पण असणार आहेत. Esim Vs Isim:
eSIM म्हणजे Embedded SIM:
हे तंत्रज्ञान तर बऱ्याच नवीन फोनमध्ये आलं पण आहे. iPhone, Samsung च्या महागड्या फोनमध्ये तुम्ही पाहिलं असेल. यात तुम्हाला वेगळं सिम कार्ड टाकायची गरजच नाही.
कंपनी फोन बनवताना मदरबोर्डवरच एक छोटीशी चिप लावून देते. तुम्हाला नंबर बदलायचा असेल किंवा कंपनी बदलायची असेल तर फक्त एक QR कोड स्कॅन करायचा, झालं काम. दुकानात जाऊन सिम कापायची किंवा बदलायची गरज नाही.
हे तर eSIM च्या पुढचं पाऊल आहे. हे खूपच आधुनिक तंत्रज्ञान आहे. Qualcomm आणि Thales या मोठ्या कंपन्यांनी याची चाचणी केली आहे. यात तर ती छोटी चिप पण नसते. फोनच्या मुख्य प्रोसेसरमध्येच सिम बसवलेलं असतं. म्हणजे सिम हे प्रोसेसरचाच एक भाग बनून जातं.
सगळ्यात मोठा फरक म्हणजे जागेचा. eSIM साठी मदरबोर्डवर वेगळी जागा द्यावी लागते. पण iSIM तर प्रोसेसरमध्येच असल्यामुळे अजिबात जागा घेत नाही. याचा फायदा असा की कंपनीला फोन अजून पातळ बनवता येईल आणि त्यात मोठी बॅटरी टाकता येईल.
दुसरा फरक म्हणजे बॅटरीचा. iSIM हे eSIM पेक्षा खूप कमी बॅटरी खातं. त्यामुळे तुमच्या फोनची बॅटरी जास्त वेळ चालेल.
तिसरा फरक म्हणजे वापर. eSIM फक्त फोन आणि स्मार्टवॉचमध्ये वापरता येतं. पण iSIM तर खूप छोटं असल्यामुळे ते भविष्यात स्मार्टवॉच, छोट्या गॅजेट्स, घड्याळं, अगदी लहान IoT डिव्हाईसमध्ये पण वापरता येईल.
याने तुमचा फोन जास्त सुरक्षित कसा होईल?हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आजकाल सिम स्वॅप करून, सिम क्लोन करून लोकांचे बँकेचे OTP चोरले जातात. पण eSIM आणि iSIM हे डिजिटल असल्यामुळे त्याचं क्लोनिंग करणं हॅकर्ससाठी जवळपास अशक्य आहे. त्यामुळे तुमचा डेटा जास्त सुरक्षित राहील.आणि दुसरा मोठा फायदा म्हणजे फोन चोरीला गेला तर.
फोनमधलं सिम काढून फेकून देतो, जेणेकरून फोन ट्रॅक होणार नाही. पण eSIM आणि iSIM असलेल्या फोनमध्ये सिम काढताच येत नाही. त्यामुळे फोन नेहमी इंटरनेटला जोडलेला राहील. पोलिसांना तो शोधणं खूप सोपं होईल.
म्हणजे एकंदरीत काय, तर सिम कार्ड गायब झाल्यामुळे फोन दिसायला सुंदर, बॅटरी जास्त टिकणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हॅकर्सपासून जास्त सुरक्षित होणार आहे. पुढच्या एक-दोन वर्षात सगळेच फोन या नव्या तंत्रज्ञानावर आलेले दिसतील.
Ans: eSIM म्हणजे Embedded SIM. ही फोनमध्ये बसवलेली इलेक्ट्रॉनिक चिप असून, त्यावर मोबाइल नेटवर्कचे प्रोफाइल सक्रिय करता येते.
Ans: iSIM म्हणजे Integrated SIM. यामध्ये SIM ची कार्यक्षमता डिव्हाइसच्या मुख्य प्रोसेसरमध्ये समाविष्ट केलेली असते.
Ans: eSIM साठी स्वतंत्र चिप असते, तर iSIM मध्ये SIM ची कार्यक्षमता प्रोसेसरमध्ये एकत्रित केलेली असते.