(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
सोनम तिच्या दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, अगदी पहिल्या प्रेग्नंसीमध्येही अभिनेत्रीचा हा उत्साह दिसून आला होता. अभिनेत्री सध्या अभिनयापासून दूर असली तरी सोशल मीडियावर तिच्या लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते.
अभिनेत्रीने अलीकडेच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या नवीनतम फोटोशूटमधील काही सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती तिच्या बेबी बंप दाखवताना दिसली आहे.
या शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनमने पांढऱ्या रंगाचा अनारकली सूट परिधान केला आहे, ज्यासोबत तिने मॅचिंग धोती स्टाईल सलवार घातला होता. या फोटोमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
या ड्रेस वर तिने साधा मेकअप, वेणी घातलेले केस, जड कानातले आणि ब्रेसलेट घालून तिचा लूक पूर्ण केला आहे. तसेच अभिनेत्रीने हातात बटवा देखील घेतला आहे.
हे सुंदर फोटो शेअर करताना सोनम कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले, 'हृदय बदलत नाही... फक्त इतरांसाठी धडकायला लागते.' असे लिहून तिने ही पोस्ट शेअर केली आहे.