
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय आणि बहुमुखी अभिनेत्री म्हणून मुक्ता बर्वे (Mukta Barve) सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री तब्बल २५ वर्षांपासून नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये काम करून आपले स्थान निर्माण केले आहे. उत्कृष्ट अभिनयकौशल्य, विविधतेने भरलेल्या भूमिका आणि प्रेक्षकांशी जोडणारा सहज संवाद यामुळे मुक्ता बर्वे चाहत्यांचे मन जिंकले आहे. व्यावसायिक आयुष्यात भरपूर यश मिळाल्यानंतरही मुक्ताचं वैयक्तिक आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे. आता अभिनेत्री वयाच्या ४६ व्या वर्षी पोहचली आहे. आणि तरीही ती अविवाहित कशी आहे? या भोचक प्रश्नांवर अभिनेत्री उत्तर देताना दिसली आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीदरम्यान मुक्ताने याबद्दल स्पष्टीकरण दिले आहे.
मुक्ता वैयक्तिक आयुष्याविषयी काय म्हणाली?
एका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीदरम्यान अभिनेत्री मुक्ता बर्वे लग्नाबद्दल म्हणाली, “मी या प्रश्नाचं उत्तरच देत नाही. मला कोणी समोर येऊन विचारतही नाही. मला वाटतं तशी गरजही नाही. कारण कोणाच्या वैयक्तिक आयुष्याविषयी का विचारावं आणि कोणी आपल्या खाजगी आयुष्याविषयी का उत्तर द्यावं. केवळ मी समाजमाध्यमात काम करते म्हणून कोणीही मला काहीही विचारु शकेल असा त्याचा अर्थ नाही.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “माझं वैयक्तिक आयुष्य मी माझ्या कामापेक्षा कायमच लांब ठेवले आहे. ते एकत्र करण्याची मला गरजही वाटत नाही. जोपर्यंत त्याचा माझ्या जगण्या वागण्यावर परिणाम होत नाही तोवर तो माझा अत्यंत वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो आदरपूर्वक लोकांनीही जपला पाहिजे. माझ्याबाबतीत लोक ते नेहमीच जपतात. पूर्वी ते गंमत म्हणून विचारलं जायचं कारण तेव्हा स्थळं यायची आणि ती अजूनही येतात. पण त्याची चर्चा किंवा तो विषय असू नये कारण वैयक्तिक आयुष्य हे नेहमीच खाजगी असतं आणि माझं क्षेत्र म्हणून जे काम आहे ते वेगळं आहे.”
गोल्डन साडीमध्ये चमकल्या अंबानी महिला, शाहरुख, रणवीरसह दिले पोझ; पाहा PHOTOS
मुक्ता बर्वेचा ‘असंभव’ चित्रपट रिलीज
अभिनेत्री मुक्ता बर्वेचा नुकताच आता ‘असंभव’ हा मराठी सिनेमा प्रदशित झाला आहे. या चित्रपटामध्ये सचित पाटील, प्रिया बापट यांचाही महत्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. हा एक थरारक आणि सहस्यमय सिनेमा आहे. सोबतच मुक्ता आता हिंदीसाठीही ऑडिशन्स देत आहे. वेबसीरिज, हिंदी सिनेमांमध्येही तिला एक्स्प्लोर करायचं असल्याचं ती काही मुलाखतींमध्ये म्हणाली आहे. मुक्ताला आणखी नव्या भूमिकांमध्ये आणि हिंदीतही पाहण्यासाठी चाहते कायमच उत्सुक आहेत.