पोट फुगण्याच्या त्रासाने त्रस्त आहात? मग आहारात करा 'या' सुपरफूड्सचे सेवन
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पपई खायला खूप जास्त आवडते. पपईचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पपईमध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया कायमच निरोगी राहते.
काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे आहारात नेहमीच काकडीचे सेवन करावे. काकडीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट क्युकरबिटासिन पोटात वाढलेली जळजळ कमी होते आणि पचनाच्या समस्यांपासून आराम मिळेल.
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स नावाचे घटक आढळून येतात. यामुळे शरीरात चांगल्या बॅक्टरीया तयार होतात. शरीरात वाढ्लेली ऍसिडिटी कमी करण्यासाठी दुपारच्या जेवणात वाटीभर दह्याचे सेवन करावे.
आल्यामध्ये असलेले जिंजरॉल आणि शोगाओल सारखे संयुगे आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी मदत करतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी आल्याच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल.
पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यामुळे पोटातील स्नायूंना अराम मिळतो. याशिवाय पुदिन्याच्या पानांचा वापर सरबत, डिटॉक्स ड्रिंक इत्यादी अनेक पदार्थ बनवण्यासाठी केला जातो.