नारळ पाणी: नारळाचं पाणी नारळाचं दूध हे शरीरासाठी पौष्टीक मानलं जातं. रोज सकाळी नारळाचं पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होेण्यास मदत होते. तसंच नारळाच्या पाण्याच्य़ा सेवनाने रक्तदोष सुधारण्यास मदत होते. बारेहरील उन्हामुळे त्वचा काळवंडली असल्यास नारळ पाणी प्यायल्याने त्वचेचं आरोग्य सुधारतं.
कोकम सरबत : कोेकम सरबतात असलेल्या गुणधर्मामुळे पचनसंस्था सुधारण्यास मदत होते. कोकम सरबतामुळे शरीर डीटॉक्स होण्यास मदत होते. , व्हिटॅमिन सी जीवनसत्त्व कोकम सरबतात मोठ्या प्नमाणात आढळतात. यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होते.
लिंबू सरबत: उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे आम्लपित्ताची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर लिंबू पाणी प्या.
भाताची पेज: उन्हाळ्याच्या दिवसात शरीरातील पाणी कमी होतं.त्यामुळे सतत अशक्तपणा जाणवणं किंवा डिहाड्रेशनचा त्रास जास्त होतो. म्हणूनच उन्हाळ्यात शरीराला पाण्याबरोबरच पोषक घटक मिळणही तितकंच महत्त्वाचं आहे. कोकणात भात प्रामुख्याने होतो. कोकणच्या उकड्या तांदळाची पेज शरीरासाठी आरोग्यवर्धक म्हटली जाते.
कलिंगड : कलिंगडामध्ये नैसर्गिकरित्या भरपूर प्रमाणात पाणी असतं. कलिंगडमध्ये असलेल्या गुणधर्मामुळे उष्णतेचे विकार होत नाही. कलिंगडामुळे शरीराला मुबलक प्रमाणात पाणी मिळतं. कलिंगडामध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असल्याने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.