Sunny Leone: सनीने आपल्या सौंदर्याने आणि वेगवेगळ्या रियालिटी शो मधून अनेक चाहत्यांच्या मनात घर केलंय. आपल्या मेहनतीने सनी आज इथपर्यंत येऊन पोहचली आहे. सनी नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी क्लासी आणि स्टायलिश फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. नुकताच तिने क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्टमधील फोटो शेअर केला असून चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव झालेला दिसून येत आहे. पाहा सनीची ही क्लासी मॉडर्न स्टाईल (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सनी लिओनची फॅशन ही नेहमीच स्टायलिश आणि कमालीची असते. यावेळीदेखील तिने अप्रतिम आणि आकर्षक अशी फॅशन केली आहे

सनीने व्हाईट ब्रालेट त्यावर ब्लू अँड व्हाईट जॅकेट आणि मिनी स्कर्ट घालून सर्वांचे लक्ष वेधून घेतलेय

यासह सनीने केस मोकळे सोडले असून ती अत्यंत ग्लॅमरस आणि मनमोहक दिसतेय. तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत

यासह तिने झेब्रा कलर्ड युनिक असे कानातले परिधान केले असून तिचा हा लुक क्लासी आणि एलिगंट दिसत आहे

ब्रॉड फ्रेम लाईट ब्लू शेड गॉगल तिने यासह मॅच केला आहे आणि या गॉगलला तिने साखळीदेखील स्टाईल केलेली दिसून येत आहे

न्यूड मेकअप करत तिने आपला हा लुक पूर्ण केलाय. बेसिक मेकअप आणि ग्लॉसी न्यूड लिपस्टिक लावलेली दिसून येतेय






