फोटो सौजन्य- pinterest
गुरुवार, १२ नोव्हेंबर रोजी मंगळ ग्रह त्याचा मित्र असलेल्या सूर्याच्या राशीत, म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. हा ग्रह धैर्य, शौर्य, ऊर्जा आणि युद्धासाठी जबाबदार मानला जातो. हे राशीबदल मंगळाचे या वर्षातील शेवटचे संक्रमण असणार आहे.
यानंतर, पुढील वर्षी ९ मार्च २०२७ रोजी मंगळ कर्क राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीतील मंगळाचे संक्रमण काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. सिंह राशीतील मंगळाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीतील लोकांना सकारात्मक फायदा होणार आहे जाणून घ्या
मेष राशीतील लोकांसाठी मंगळाचे संक्रमण शुभ सकारात्मक राहील. या काळात तुम्हाला नवीन अपेक्षित यश मिळेल. आर्थिक लाभाच्या संधी वाढतील. तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होईल. नशीब तुमच्या बाजूने असेल. तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल.
मंगळाचे संक्रमण कर्क राशींच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि फायदेशीर ठरेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र हे संक्रमण कर्क राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायातून चांगला आणि भरीव नफा मिळेल. गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील. नोकरदार लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात.
सिंह राशींच्या लोकांसाठी हे संक्रमण अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या इच्छेप्रमाणे नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होईल. व्यवसाय करणाऱ्यांना भरघोस नफा मिळेल. घरातील वातावरण सुखद राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अगदी फायदेशीर राहील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षित यश मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमच्यामधील प्रतिष्ठा वाढेल. नोकरदार व्यक्तींना नवीन नोकरी मिळवण्याच्या चांगल्या संधी मिळतील. पदोन्नती मिळण्याचीही चांगली शक्यता आहे. नशिबाची साथ मिळेल, ज्यामुळे तुमची अनेक प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण होतील. या काळात तुम्हाला काही चांगली बातमीही ऐकायला मिळू शकते.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: १२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ वाजून १८ मिनिटांनी मंगळ कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे
Ans: ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा साहस, ऊर्जा, आत्मविश्वास, पराक्रम आणि इच्छाशक्तीचा कारक मानला जातो. सिंह राशीत प्रवेश केल्यामुळे या गुणांशी संबंधित घडामोडींना महत्त्व प्राप्त होते.
Ans: मंगळाचा सिंह राशीतील प्रवेशाचा मेष, कर्क, सिंह आणि वृश्चिक राशींच्या लोकांना फायदा होणार आहे






