भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये १३ नोव्हेंबर रोजी तिसरा T२० सामना रंगणार आहे. यासाठी भारताचा संघ सेंच्युरियनला पोहोचला आहे. भारताचा संघाने या मालिकेचा पहिला सामना जिंकला आहे. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ६१ धावांनी पराभूत केलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने दुसरी सामन्यात भारताला ३ विकेट्सने पराभूत केलं आहे. त्यामुळे चार सामन्यात मालिकेत आता बरोबरी झाली आहे. आज भारताचा संघ सेंच्युरियनला जातानाचे काही फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत यावर एकदा नजर टाका.
भारताच्या गोलंदाजांनी आतापर्यत कमालीची कामगिरी केली आहे. फोटो सौजन्य-बीसीसीआय
भारताचा संघ लवकरच बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला गेला आहे यामध्ये भारताचे मुख्य कोच गौतम गंभीर असणार आहेत, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेत सध्या व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाला कोचिंग देत आहेत.
टिळक वर्मा टीम इंडियामध्ये ११ महिन्यानंतर भारताच्या संघामध्ये पुनरागमन झाले आहेत. सध्या तो भारताच्या संघासाठी चांगली कामगिरी करत आहे.
तिसऱ्या सामन्यांमध्ये भारताचा संघ कशी कामगिरी करेल यावर प्रेक्षकांच्या नजर असणार आहे. भारताच्या संघाची नजर अभिषेक शर्माकडे असणार आहे मागील दोन सामन्यांमध्ये तो फेल झाला आहे.
वरून चक्रवर्तीने मागील दोन सामन्यांमध्ये भारताच्या संघासाठी कमालीची कामगिरी केली आहे. पहिल्या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतले तर दुसऱ्या सामन्यात ५ विकेट्स घेतले.
हार्दिक पंड्या हा भारतीय संघाचा मुख्य खेळाडू आहे. त्याने बांग्लादेशविरुद्ध झालेल्या मालिकेत सुद्धा कमालीची कामगिरी करून दाखवली आहे.