शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2022) सुरुवात झाली आहे. सगळीकडे देवीचं आगमन झालं आहे. ठाण्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दुर्गेश्वरीचं आगमन झालं आहे. ठाण्यातील टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवी (Tembhi Naka Devi) ही आनंद दिघेंची देवी म्हणून प्रसिद्ध आहे. ढोल ताशा, बँड पथकाच्या साथीने देवीची वाजत गाजत मिरवणूक काढून तिला मंडपात आणण्यात आलं.