Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MLC Election 2026 : अखेर मंगेश चिवटेंची माघार! पुण्यात भाजपला मोठा दिलासा, महायुतीतील तिढा सुटला?

MLC Election 2026 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील बंडखोरीच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील मंगेश चिवटे आणि पुणे पदवीधर मतदारसंघातील भैय्या माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले.

  • By विवेक
Updated On: Oct 09, 2026 | 05:04 PM
Eknath Shinde Mangesh Chivate

Eknath Shinde Mangesh Chivate

Follow Us
Follow Us:
  • पुणे शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेच्या मंगेश चिवटेंची माघार
  • पुणे पदवीधरमधून राष्ट्रवादीच्या भैया माने यांचाही उमेदवारी अर्ज मागे
  • पुण्यातील महायुतीमधील बंडखोरी संपुष्टात
 

MLC Election 2026 : राज्यात विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणुकांची रणधुमाळी आता सुरु झाली आहे. आज (शुक्रवार, 9 ऑकटोबर) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्या पार्श्वभूमीवर बंडखोरी करून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. अश्यातच पुणे शिक्षक मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत असून शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. पुण्यातून चिवटेंनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत तणावाचे वातावरण होते. मात्र आता त्यांनी आपला अर्ज मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासोबतच, पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या प्रताप भैया माने यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे या जागांवरून महायुती निर्माण झालेला तिढा आता संपुष्टात आल्याचे चित्र दिसत आहे.

वरिष्ठांच्या आदेशानंतर घेतला माघार घेण्याचा निर्णय

पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनीही अर्ज दाखल केल्याने महायुतीसमोर अडचण निर्माण झाली होती. एकाच आघाडीतील दोन उमेदवार मैदानात असल्याने मतविभाजनाची शक्यता व्यक्त केली जात होती.

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले

अखेर पक्षातील वरिष्ठांच्या आदेशानंतर मंगेश चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. अर्ज माघारीनंतर चिवटेंना माध्यमांनी याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी थोडक्यात प्रतिक्रिया देत, “पक्षाचे वरिष्ठ नेते यावर भाष्य करतील, मी लहान कार्यकर्ता आहे,” असे विधान केले.

चिवटे यांच्या या प्रतिक्रियेमुळे आता शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते या घडामोडींवर काय भूमिका मांडतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हसन मुश्रीफ यांच्या विनंतीनंतर प्रताप मानेंनीही घेतली माघार

भाजपने महायुतीकडून पुणे पदवीधर मतदारसंघातून स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप उर्फ भैय्या माने यांनीही अर्ज दाखल केल्याने महायुतीमध्ये पेच निर्माण झाला होता. अखेर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मानेंची भेट घेऊन त्यांची समजूत काढली. जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे आणि सुमित कदम यांनीही माघार घेण्याची विनंती केल्याचे मानेंनी सांगितले.

माघारीबाबत बोलताना भैय्या माने म्हणाले की, कार्यकर्त्यांनी केलेले शक्तिप्रदर्शन हे त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी होते. आपल्यावर कोणताही दबाव नव्हता. मात्र, महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण उमेदवारी मागे घेतली.

“मी माघार घेतल्याने नक्कीच महायुतीला फायदा होईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, माघारीच्या बदल्यात कोणतेही आश्वासन मिळाले नसल्याचेही माने यांनी सांगितले.

आता विधानपरिषद निवडणुकीत कोणाचे पारडे जड?

महायुतीतील दोन्ही उमेदवारांनी माघार घेतल्याने पुणे शिक्षक आणि पुणे पदवीधर मतदारसंघांतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. मात्र, निवडणुकीतील लढत अद्याप महत्त्वाची ठरणार आहे. माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनीही पुणे शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांमध्ये कशी लढत रंगते, याबाबत उत्सुकता आहे. सचिन सानप यांच्या भूमिकेकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकीकडे महायुतीने अंतर्गत मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसरीकडे उर्वरित उमेदवारांच्या भूमिकेमुळे निवडणुकीतील चुरस कायम राहण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

💡

Frequently Asked Questions

  • Que: मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज का मागे घेतला?

    Ans: पक्षातील वरिष्ठांच्या आदेशानंतर मंगेश चिवटे यांनी पुणे शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

  • Que: भैय्या माने यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय का घेतला?

    Ans: महायुतीतील नेते हसन मुश्रीफ, विनय कोरे आणि सुमित कदम यांच्या विनंतीला प्रतिसाद देत आपण माघार घेतल्याचे भैय्या माने यांनी सांगितले.

  • Que: मंगेश चिवटे यांनी उमेदवारी माघारीनंतर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: “पक्षाचे वरिष्ठ नेते यावर भाष्य करतील, मी लहान कार्यकर्ता आहे,” अशी प्रतिक्रिया मंगेश चिवटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Web Title: Mlc election 2026 mangesh chivate bhaiyya mane withdrawal vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 05:00 PM

Topics:  

  • BJP
  • Eknath Shinde
  • Mahayuti
  • MLC Election
  • pune news
  • shivsena

संबंधित बातम्या

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले
1

Gajanan Kirtikar: शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी! गजानन कीर्तिकर ठाकरे गटात परतणार? घरवापसीच्या चर्चांवर स्पष्टच बोलले

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
2

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण;  ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
3

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण; ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!
4

Bypoll Results 2026: आज चार राज्यांतील 6 जागांचा निकाल; विजय आणि सुवेंदू अधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.