बाॅलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाने आपल्या कारकिर्दित अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. आजही अनेक दिग्गज अभिनेत्यांमध्ये गोविंदाचे नाव आवर्जून घेतले जाते. आज आम्ही तुम्हाला गोविंदाच्या अशा एका चित्रपटाविषयी सांगणार आहोत, ज्याला अवघ्या 14 वर्षांनंतरही रिलीज करण्यात आले नाही. गोविंदाचा हा विनोदी चित्रपट 2011 मध्ये प्रदर्शित होणार होता.
14 वर्षांपूर्वीचा गोविंदाचा तो चित्रपट, अजूनही होऊ शकला नाही रिलीज; कारण ऐकून दातखिळी बसेल
गोविंदाच्या या चित्रपटाचे नाव 'बंदा ये बिंदास है' असे आहे. हा चित्रपट दिवंगत दिग्दर्शक रवी चोप्रा यांनी बनवला आहे
रिपोर्टनुसार, या चित्रपटाचे शूटिंग जवळजवळ संपले होते मात्र या चित्रपटावर काॅपिराईट उल्लंघनाचा खटला दाखल करण्यात आला
हाॅलिवूडमधील कंपनी 20th Century Fox ने चित्रपटावर खटला दाखल केला होता. ही कंपनी आता डिज्नीचा एक भाग आहे
कंपनीने गोविंदाच्या या चित्रपटाला 'माई कजन विन्नी' चित्रपटाचा अनधिकृत रिमेक असल्याचे म्हटले आहे
हे प्रकरण मिटवण्यासाठी निर्मात्यांना मोठी रक्कम मोजावी लागली आणि त्यांचे यात खूुप नुकसानही झाले. 2014 मध्ये रवी चोप्रा यांचे निधन झाले. मात्र या चित्रपटाला आजवर रिलिज करण्यात आले नाही