मुंबई: नवभारत इन्फ्लुएन्सर अवॉर्ड्स २०२५ मध्ये अलिबागच्या शर्विका म्हात्रे हिने सर्वांचे लक्ष वेधले. केवळ ७ वर्षांची असताना ३,००० फूट उंचीचा जीवधन किल्ला तिने अवघ्या ३ तासांत सर केला. तिच्या या धाडसी कामगिरीसाठी शर्विकाला ‘बेस्ट स्पोर्ट्स इन्फ्लुएन्सर’ (Best Sports Influencer) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर शर्विकाने ऐतिहासिक संवाद सादर करून उपस्थितांची ‘वाहवा’ मिळवली, ज्यामुळे तिची अष्टपैलू प्रतिभा दिसून आली.