'या' साड्या वाढवतात सणावारांची शोभा, रॉयल- मॉर्डन लुकमध्ये चारचौघात दिसाल अधिक सुंदर
महाराष्ट्राची ओळख असलेली पैठणी साडी प्रत्येक महिलेच्या कपाटात असलीच पाहिजे. लाल, हिरव्या, निळ्या किंवा गुलाबी रंगाची पैठणी रॉयल लुक देते.
सोशल मीडियावर माहेश्वरी सिल्क साडीची मोठी क्रेझ आहे. मध्य प्रदेशात विणण्यात आलेली माहेश्वरी साडी लग्न समारंभात किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही नेसू शकता.
बालरुची साडी पश्चिम बंगालमध्ये तयार केली जाते. या साडीवर बारीक नक्षीकाम, रेशमी धाग्यांचा वापर ही साडीची खासियत आहे. बालरुची साडी पारंपरिक कथा आणि विचारसरणीतून तयार करण्यात आली आहे.
प्रत्येक महिलेच्या कपाटात एकतरी बनारसी साडी असायलाच हवी. लाल रंगाची बनारसी साडी रॉयल लुक देते. लाल रंगाच्या साडीवर सोन्याचे दागिने परिधान केल्यास लुक खूप सुंदर दिसेल.
ओरिजनल सिल्क साडी नेसायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. कांजीवरम स्लिक साडीची मोठी बॉर्डर पारंपरिक पद्धतीने बनवली जाते.