भारतीय संघाचा दिग्गज कसोटीपटू चेतेश्वर पुजाराने 24 ऑगस्ट 2025 रोजी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याने भारतासाठी 103 कसोटी सामने खेळले असून, त्यात 7195 धावा केल्या आहेत. पुजाराने आपला शेवटचा कसोटी सामना 2023 च्या WTC फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हलवर खेळला होता.
विराट कोहलीने १२ मे २०२५ रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. भारताच्या माजी कर्णधाराने १२३ कसोटी खेळल्या आणि ९२३० धावा केल्या.
रोहित शर्माने ७ मे २०२५ रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहितने भारतासाठी ६७ कसोटी सामने खेळले आणि ४३०१ धावा केल्या.
श्रीलंकेचा माजी कर्णधार दिमुथ करुणारत्नेने फेब्रुवारी २०२५ मध्ये सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने श्रीलंकेसाठी १०० कसोटी सामने खेळले आणि ७२२२ धावा केल्या.
श्रीलंकेचा माजी कर्णधार आणि महान अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूजने जुलै २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटला रामराम केला. त्याचा शेवटचा रेड-बॉल सामना बांगलादेशविरुद्ध गॉलमध्ये झाला होता. मॅथ्यूजने ११९ कसोटी खेळल्या आणि ३३ विकेट्स घेण्यासोबतच ८२१४ धावा केल्या.
बांगलादेशचा अनुभवी फलंदाज तमीम इकबालने 10 जानेवारी 2025 रोजी क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याने बांगलादेशकडून 70 कसोटी सामने खेळले असून, 5134 धावा केल्या आहेत, जो कोणत्याही बांगलादेशी खेळाडूने केलेला दुसरा सर्वाधिक धावांचा विक्रम आहे.