'हे' आहेत उत्तम कोर्सेस. (फोटो सौजन्य - Social Media)
BA (बॅचलर ऑफ आर्ट्स) जर तुम्हाला पत्रकारितेत किंवा प्रशासकीय सेवेत करिअर करायचे आहे. तर नक्कीच BA पर्याय उत्तम आहे. या कार्यक्रमात शिक्षण घेऊन तुम्ही संशोधन तसेच अध्यापनात करिअर घडवू शकता. इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र यासारख्या विविध शाखांमध्ये विशेष अभ्यास या कोर्सच्या माध्यमातून करता येते. BA (बॅचलर ऑफ आर्ट्स) जर तुम्हाला पत्रकारितेत किंवा प्रशासकीय सेवेत करिअर करायचे आहे. तर नक्कीच BA पर्याय उत्तम आहे. या कार्यक्रमात शिक्षण घेऊन तुम्ही संशोधन तसेच अध्यापनात करिअर घडवू शकता. इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि मानसशास्त्र यासारख्या विविध शाखांमध्ये विशेष अभ्यास या कोर्सच्या माध्यमातून करता येते.
BA LLB (बॅचलर ऑफ आर्ट्स + एलएलबी) कायद्याचा अभ्यास करायचा असेल आणि या क्षेत्रात मोठे भवितव्य घडवायचे असेल तर BA LLB करणे अतिउत्तम ठरेल. प्रशासन क्षेत्रात मोठ्या पदी काम करण्यासाठी उमेदवार BA LLB असणे अनिवार्य असतो. जर तुम्ही या कार्यक्रमात शिक्षण घेतले तर पुढे जाऊन तुम्ही वकील, न्यायाधीश, कायदा सल्लागार, आणि सरकारी सेवांमध्ये नोकरीची संधी मिळवू शकता.
BFA (बॅचलर इन फाइन आर्ट्स) चित्रकलेची आवड असेल तर नक्कीच येथे करिअर घडवू शकता. चित्रकला, ग्राफिक डिझाइन, Animation, फॅशन डिझाइन आणि जाहिरात क्षेत्रात संधी उपल्बध होतात. क्रिएटिव्ह क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी नक्कीच या क्षेत्रात यावे.
BHM (बॅचलर इन हॉटेल मॅनेजमेंट) हॉटेल मॅनेजमेंट हा फार प्रसिद्ध कोर्स आहे. हॉस्पिटॅलिटी तसेच पर्यटन क्षेत्रात रस असणाऱ्यांसाठी हा उत्तम कोर्स आहे. या क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना हॉटेल, रेस्टॉरंट, एअरलाइन, क्रूझ, आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये उत्तम संधी मिळतात.
फक्त इतकेच नव्हे तर यानंतर उच्च शिक्षणाकडे वळावे. या कोर्सनंतर MBA, M.A, PG डिप्लोमा किंवा सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करता येते. विविध क्षेत्रांमध्ये उच्च पदस्थ नोकऱ्या आणि स्वतंत्र व्यवसायाच्या संधी मिळवता येतात.