मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी कोणत्या कला प्रभावी
तणाव आणि चिंता दूर करण्यासाठी तुम्ही वीण काम करू शकता. वीण काम केल्यामुळे आनंदी हार्मोनस निर्माण होऊन मानसिक आनंद वाढतो. तसेच सतत काम करत राहिल्यामुळे आनंद आणि समाधानी वाटते.
शाई, पेन किंवा ब्रशने वेगवेगळी अक्षरे आणि शब्द लिहणे ही एक कला असून याला कॅलिग्राफी असे बोलले जाते. यामुळे संयम आणि लक्ष केंद्रित राहून मन शांत होते.
मंडल हा शब्द संस्कृतमधील शब्द आहे, ज्याचा अर्थ पवित्र वर्तुळ असा आहे. पूर्वीच्या काळात अनेक राज्यांच्या दरबारामध्ये किंवा घरांमध्ये मंडला आर्ट काढलेली महत्वपूर्ण चित्र आहेत. या डिझाइन्स फोकस आणि लक्ष वाढवून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करतात.
पेन आणि कागदाच्या सहाय्याने केल्या जाणाऱ्या कलेला स्क्रिबलिंग असे म्हणतात. यामुळे मानसिक ताण, चिंता दूर होऊन मन शांत होते.
रंगाचे मिश्रण करून त्यातून वेगळा रंग तयार करणे, ही कला आहे. तयार केलेल्या रंगापासून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चित्र काढू शकता. रंगांचे मिश्रण केल्यामुळे स्मरणशक्तीही वाढते आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होते.