लग्नात नवरीच्या गळ्यात घातला जाणारा महत्वपूर्ण दागिना म्हणजे मंगळसूत्र. मंगळसूत्राशिवाय गळा उठून दिसत नाही. रोजच्या वापरासाठी महिला अतिशय नाजूक साजूक डिझाईनचे मंगळसूत्र घालण्यास पसंती दर्शवतात.सणावाराच्या दिवशी मोठं मंगळसूत्र गळ्यात घालते जाते. तर ऑफिसमध्ये किंवा रोजच्या वापरासाठी अतिशय नाजूक आणि कमी वजनातील मंगळसूत्र तुम्ही बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला रोजच्या वापरातील कमी वजनाच्या मंगळसूत्रांच्या काही आकर्षक डिझाईन सांगणार आहोत.ल या डिझाईन कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर सुंदर दिसतील. (फोटो सौजन्य – pinterest)
रोजच्या वापरात १८ कॅरेट मंगळसूत्रांच्या 'या' डिझाईन वाढवतील गळ्याची शोभा
सोन्याप्रमाणे चांदीचे मंगळसूत्रसुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. चांदीच्या मंगळसूत्रांमध्ये तुम्ही या डिझाईनचे मंगळसूत्र तयार करून घेऊ शकता. कॉटनच्या साडीवर या डिझाईनचे मंगळसूत्र अतिशय सुंदर दिसेल.
कॅज्युअल वेअर, ऑफिस वेअर, पार्टी-फंक्शनसाठी या डिझाईनचे मंगळसूत्र अतिशय उत्तम पर्याय आहे. या डिझाईनचे मंगळसूत्र घातल्यानंतर तुम्हाला इतर कोणताही दागिना घालण्याची आवश्यकता भासणार नाही.
दोन किंवा तीन सरीचे या डिझाईनचे मंगळसूत्र तुम्ही बनवून घेऊ शकता. यामध्ये नाजूक साजूक मणी किंवा वाट्या अतिशय सुंदर दिसतात.
या डिझाईनच्या मंगळसूत्राची सोशल मीडियावर मोठी क्रेझ आहे. काळ्या मण्यांमध्ये नाजूक साजूक डायमंड किंवा मोती लावल्यास स्टायलिश लुक दिसेल.
काळ्या मण्यांच्या नाजूक सरीमध्ये या डिझाईनचे पेंडेंट अतिशय सुंदर दिसेल. डायमंड मंगळसूत्र कोणत्याही साडीवर किंवा ड्रेसवर तुम्ही घालू शकता.