आजच्या काळामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यचे प्रमाण फार वाढले आहे. अगदी तरुणमंडळी या मृत्यूला बाली पडत आहेत. याला शरीरामध्ये असलेले काही आजारही कारणीभूत असतात. जर एखाद्याला या आजारांची लागण आहे, तर त्याने स्वतःच्या बचावासाठी आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी म्हणून आरोग्यविषयक सर्व पथ्य पाळले पाहिजेत. पुढील आजारांची लागण असलेल्या रुग्णांना हृदय विकाराचा जास्त धोका असतो.
'या' आजारांची लागण असलेल्या रुग्णांनी राहावे जपून. ( फोटो सौजन्य - Social Media )
उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना हृदयाच्या बाबतीत फार सावध राहावे लागते. जेव्हा रक्ताचा दाब वाढतो, तेव्हा रक्ताचा फ्लो नियंत्रणात ठेवण्यासाठी पंपिंग वाढते. ज्याचा नसांवर ताण येतो. परिणामी, हृदयाला त्रास होतो.
शरीरातील कोलेस्ट्रॉलच्या वाढीमुळे रक्तवहनात बाधा निर्माण होते. त्यामुळे नियंत्रणासाठी हृदयाचे धडकने वाढते आणि परिणामी त्याचा त्रास हृदयावर होतो.
मधुमेह असणाऱ्या रुग्णांना हाई ब्लड प्रेशर तसेच हाई कोलेस्ट्रॉलच्या त्रासाला सामोरे जावे लागते. ज्याचा अर्थातच परिणाम हृदयावर होतो.
लठ्ठपणा कधी एकटा राहत नाही तो इतर आजारांनाही सोबत घेऊन चालतो. सर्व आजारांचा साथीदार असणारा लठ्ठपणा हृदयाच्या आरोग्याला बाधित करतो.
कधी कधी हृदयविकार अनुवांशिक असू शकतो. अनुवांशिकतेतून हा आजार येण्याची शक्यता जास्त असते.