दैनंदिन आहारात खाल्ले जाणारे 'हे' पदार्थ शरीरात वाढवतात Uric acid
रात्रीच्या जेवणात चुकूनही मसूर डाळ, चणाडाळ किंवा इतर कोणत्याही डाळींचे अजिबात सेवन करू नये. या डाळींच्या सेवनामुळे शरीरात युरिक अॅसिडची पातळी वाढू लागते. डाळींमध्ये मोठ्या प्रमाणावर प्युरीन असते.
ऑर्गन मीट, रेड मीट, मासे किंवा चिकन, मटण खाल्ल्यास शरीरात प्युरिन वाढू लागते. तसेच रात्रीच्या वेळी मांस खाल्ल्याने सांध्यामध्ये यूरिक अॅसिडचे क्रिस्टल्स जमा होऊ लागतात.
साखर, गोड पदार्थ, गोड पेये आणि फ्रुक्टोजयुक्त पदार्थ हे यूरिक अॅसिड झपाट्याने वाढवणाऱ्या पदार्थांमध्ये गणले जातात.त्यामुळे कमीत कमी गोड पदार्थ खावेत. अतिगोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे यकृत आणि मूत्रपिंडांवर दबाव येतो.
फणस खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. पण रात्रीच्या वेळी चुकूनही फणसाचे सेवन करू नये. यामुळे शरीरात यूरिक अॅसिडची पातळी झपाट्याने वाढू लागते. फणस खाल्ल्याने सांधे सूज, किडनीच्या समस्या आणि संधिवाताचा त्रास होतो.
नियमित दारू किंवा धूम्रपान करू नये. यामुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते. सतत सिगारेट किंवा इतर कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन केल्यामुळे लिव्हर आणि किडनीच्या आरोग्याला हानी पोहचते.