मधुमेह झाल्यानंतर ही फळे खाऊ नये
आंबा या फळामध्ये नैसर्गिक गोडवा असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढत जाते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कमी कमी आंब्याचे सेवन करावे.
पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेक लोक आहारात केळ्याचे सेवन करतात. केळ्यांमध्ये नैसर्गिक गोडवा आढळून येतो, त्यामुळे मधुमेह झालेल्या रुग्णांनी केळ्याचे सेवन करू नये.
अननसमध्ये नैसर्गिक गोडवा असतो. त्यामुळे मधुमेह झालेल्या रुग्णांनी अननसाचे सेवन करू नये.
चेरीमध्ये फ्रक्टोजचे प्रमाण जास्त आढळून येते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी चेरी हे फळ खाऊ नये.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं हिरव्या आणि काळ्या रंगाची द्राक्ष खायला खूपं आवडतात. याशिवाय यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात आढळून येते. द्राक्षांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते.