लग्नाच्या दिवशी चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो मिळवण्यासाठी आहारात करा 'या' पेयांचे सेवन
उन्हाळा वाढल्यानंतर त्वचा कोरडी आणि निस्तेज होऊन जाते. काळवंडलेली त्वचा उजळदार करण्यासाठी नियमित नारळ पाण्याचे सेवन करावे. नारळ पाणी प्यायल्यामुळे त्वचेला अनेक फायदे होतात.
टोमॅटोमध्ये लायकोपिन नावाचे गुणधर्म आढळून येते, ज्यामुळे चेहऱ्यावर आलेले पिंपल्स आणि डाग घालवण्यासाठी मदत होते. शरीर आतून डिटॉक्स करण्यासाठी नियमित टोमॅटोचा रस प्यावा.
काकडी शरीर हायड्रेट ठेवण्याचे काम करते. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी उन्हाळ्यात काकडी पुदिन्याच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे त्वचा ग्लोइंग दिसते.
विटामिन सी युक्त आवळ्याच्या रसाचे नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक फायदे होतील. यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक वाढेल आणि त्वचा कायम फ्रेश, सुंदर दिसेल. कोलेजनचे उत्पादन वाढून त्वचा घट्ट करण्याचे काम आवळ्याचा रस करतो.
चेहऱ्यावरील हरवलेली चमक पुन्हा मिळवण्यासाठी गाजर बीटच्या रसाचे सेवन करावे. यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स, विटामिन ए आणि लोह शरीरासाठी अतिशय महत्वाचे ठरतात.