तुमच्याकडे जर अँँड्रॉईड स्मार्टफोन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. स्मार्टफोन केवळ कॉल, चॅट, पेमेंटसाठी नाही तर इतर अनेक कामांसाठी वापरला जातो. अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये असे काही हीडन फीचर्स आहेत, ज्यासमोर तर आयफोन देखील फेल होणार आहे. हे फीचर्स आयफोनपेक्षा अधिक कमाल आहेत. खूप कमी लोकांना या हिडन फीचर्सबद्दल माहिती आहे. एकदा तुम्ही या फीचर्सचा वापर करायला सुरुवात केली की, तुमच्या ओळखीचे लोकही म्हणतील "क्या बात है बॉस!" (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: हे आहेत अँड्रॉईड स्मार्टफोनचे टॉप हिडन फीचर्स, यासमोर iPhone सुद्धा पडेल फीका
अनेक Android फोन्स जसं की Samsung, OnePlus आणि Xiaomi मध्ये असं फीचर आहे जिथे डबल टॅप केल्यास स्क्रिन लॉक होते आणि ऑन होते.
अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये असणारं Smart Lock फीचर तुमचा फोन ऑटोमॅटिकली अनलॉक करते. यासाठी तुम्हाला घरात, ऑफीसमध्ये काही जागा ठरवाव्या लागतील. या जागेवर फोन ठेवल्यास तुमचा फोन ऑटोमॅटिकली अनलॉक होईल.
Split Screen मोड मध्ये तुम्ही एकाच स्क्रीनमध्ये दोन अॅप्सचा वापर करू शकता. हे फीचर मल्टीटास्किंगसाठी फायदेशीर आहे.
अँड्रॉइडमध्ये एक System UI Tuner नवाचे हिडन फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही स्टेटस बार, नोटिफिकेशन आणि क्विक टॉगल आयकॉन कस्टमाइज करू शकता.
जर तुम्हाला एकाच फोनवर दोन व्हॉट्सअॅप अकाउंट चालवायचे असतील तर अँड्रॉइडमधील ड्युअल अॅप्स किंवा अॅप क्लोन फीचर तुम्हाला मदत करेल.