लातूर जिल्ह्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतजमिनी वाहून गेल्या, पशुधनाचे नुकसान झाले तर सोयाबीनसारखी पिके पूर्णपणे हातची गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मदतीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने लातूर जिल्ह्यासाठी २४४ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण झाले असून दोन ऑक्टोबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा होईल. सप्टेंबरमधील नुकसानीबाबतही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून, “शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचेपर्यंत मी व सरकार शांत बसणार नाही,” असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला.