फोटो सौजन्य- pinterest
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह विशिष्ट कालावधीनंतर त्यांची स्थिती बदलत राहतात आणि त्याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर होताना दिसून येतो. न्याय आणि कर्माचा ग्रह असलेल्या शनिदेवाला आपल्या सूर्यमालेतील सर्वात शक्तिशाली ग्रहांपैकी एक मानले जाते आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने सर्व राशींच्या लोकांचे भाग्य आणि जीवन बदलू शकते. हा ग्रह राशीचक्र 30 वर्षांत पूर्ण करतो आणि शनि त्याच नक्षत्रात येण्यासाठी सुमारे 27 वर्षे घेतो. यावेळी ऑक्टोबर महिन्यामध्ये शनि पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या राशीच्या लोकांवर होणार आहे. कोणत्या आहेत त्या राशी जाणून घ्या
सध्या शनि मीन राशीत वक्री आहे. त्यानंतर तो आता शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी रात्री 9.49 वाजता पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे पडणार आहे. पूर्वा भाद्रपद नक्षत्राला गुरु ग्रहाचे नक्षत्र म्हणून ओळखले जाते. या काळात काही राशीच्या लोकांना त्याच्या संक्रमणाचा फायदा होणार आहे.
पूर्वा भाद्रपद नक्षत्रात शनिचे संक्रमण कर्क राशीच्या लोकांना खूप फायदेशीर ठरणार आहे. कर्क राशीच्या लोकांना विविध क्षेत्रात अपार यश मिळेल. तसेच तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. ज्यामुळे कर्क राशीच्या लोकांना चांगले भाग्य मिळेल. शनीच्या संक्रमणामुळे कर्क राशीचे लोक कुटुंबासोबत चांगला वेळ घालवतील. शनिच्या आशीर्वादामुळे तुमच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होईल.
पूर्वा भाद्रपद नक्षत्रातील शनिचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण चांगले राहील. यावेळी तुम्हाला धनप्राप्तीच्या अनेक संधी मिळतील. तसेच तुम्हाला नशिबाची साथ देखील मिळेल. जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर या काळात ते तुम्हाला परत मिळतील. व्यवसायात चांगली प्रगती होईल आणि आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच कोणत्याही मोठ्या आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. या काळात तुमचे आरोग्य देखील चांगले राहील. तसेच तुम्ही परदेशात चांगला व्यवसाय करु शकता. वैवाहिक जीवनात शांती राहील.
शनीच्या नक्षत्रातील बदलाचा परिणाम कुंभ राशीच्या लोकांवर सकारात्मक होईल. या काळात तुमचे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन चांगले राहील. कामासाठी परदेश प्रवासाच्या संधी मिळू शकतात. तसेच तुम्ही विविध उत्साहांमध्ये सहभागी होऊ शकतात.
पूर्वा भाद्रपद नक्षत्रात शनिचे होत असलेले संक्रमण या राशीच्या लोकांसाठी शुभ असणार आहे. याचा परिणाम म्हणजे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात अनेक फायदे होणार आहेत. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांकडून आणि सहकाऱ्यांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. प्रशासन, राजकारण किंवा प्रशासनाशी संबंधित क्षेत्रात विशेष लाभ मिळू शकतात. यासोबतच व्यवहार आणि गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा मिळू शकतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)