लग्नसराईत परिधान करा 'या' पद्धतीचे राजेशाही तोडे
गहूच्या आकारानुसार तयार करण्यात आलेले तोडे हातामध्ये परिधान केल्यानंतर हात अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात.
पूर्वीच्या काळी स्त्रियांच्या शृंगारात तोड्यांना विशेष महत्व होते. सण,उत्सवाच्या दिवसांमध्ये महिला हातामध्ये राजेशाही तोडे परिधान करत होत्या.
लग्न समारंभात साडी नेसल्यानंतर प्रामुख्याने सोन्याचे किंवा चांदीचे तोडे परिधान केले जातात. महाराष्ट्रात नववधूला तोडे घालण्याची परंपरा आहे.
राजेशाही तोड्यानां आर्थिक महत्व लाभले आहे. सोन्याचे तोडे आर्थिक स्थैर्याचे प्रतिक मानले जातात. पूर्वीच्या काळापासून ते आत्तापर्यंत अनेक महिला अजूनही हातामध्ये राजेशाही तोडेच परिधान करतात.
कुटुंबामध्ये पिढ्यानुपिढ्यांचा वारसा तोडे, गळ्यात हार इत्यादी अनेक दागिने वापरले जात आहेत. याशिवाय तुम्ही सोनं कीवच चांदीमध्ये तोडे बनवून घेऊ शकता.