साधी हेअरस्टाईल होईल आणखीनच उठावदार! गजरा माळण्याच्या 'या' युनिक आयडिया लुक करतील सुंदर
काहींना केसांमध्ये भरपूर गजरे घालायला आवडतात. अशावेळी तुम्ही केसांची सुंदर वेणी घालून या पद्धतीने केसांमध्ये गजरे माळू शकता. वेणीच्या भोवती आणि वेणीच्या खाली लावलेले गजरे अतिशय सुंदर दिसतात.
लग्नातील नऊवारी किंवा सहावारी साडीवर तुम्ही बन बांधल्यास या पद्धतीने गजरा लावू शकता. गजऱ्यासोबतच कोणतीही हेअर ब्रोच लावल्यास केस आकर्षक दिसतील.
मोगऱ्याच्या फुलांपासून तुम्ही या पद्धतीने गजरा तयार करून घेऊ शकता. हा गजरा थेट केसांच्या अंबाड्यावर लावून नंतर पिन लावून सेट करावा.
लांब केस असलेल्या महिला साडी किंवा ड्रेस घातल्यानंतर वेणी घालतात. वेणी घातल्यानंतर यापद्धतीने केसांमध्ये भरपूर गजरे लावल्यास केसांची शोभा वाढेल.
लहान केसांची हेअर स्टाईल करताना नेमकं काय करावं, बऱ्याचदा सुचत नाही. अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये केसांच्या पुढील भागात वेणी बांधून पाठीमागे या पद्धतीने गजरा लावून केस सेट करू शकता.