त्वचेची काळजी घेताना सर्वच महिला वेगवेगळे स्किन केअर, महागड्या स्किन ट्रीटमेंट तर काहीवेळा घरगुती उपाय सुद्धा केले जातात. पिंपल्स, काळे डाग, सुरकुत्या आल्यानंतर स्किन सीरम लावले जातात. पण त्याचा फारसा परिणाम त्वचेवर दिसून येत नाही. पण त्याऐवजी टोमॅटोच्या रसाचा वापर त्वचेसाठी करावा. टोमॅटोच्या रसात असलेले गुणकारी घटक त्वचा आतून स्वच्छ करतात आणि चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यास मदत करते. त्वचा उजळदार करण्यासाठी कायमच बाजारातील महागड्या स्किन केअरचा वापर कारण्याऐवजी घरगुती उपाय करावेत. चला तर जाणून घेऊया टोमॅटोचा वापर करण्याची योग्य पद्धत.
चेहऱ्यावरील काळे डाग घालवण्यासाठी 'या' पद्धतीने करा टोमॅटोच्या रसाचा वापर, त्वचेवर येईल इंस्टंट ग्लो

धावपळ, कामाचा तणाव आणि रोजच्या कामातून फेशिअल किंवा स्किनची काळजी घेण्यासाठी वेळ मिळत नाही. अशावेळी टोमॅटोच्या रसाचा वापर त्वचेसाठी करावा.

निस्तेज झालेली त्वचा उजळदार आणि फ्रेश करण्यासाठी टोमॅटोचा रस प्रभावी ठरतो. टोमॅटो मधोमध कापून त्यातील गर काढून घ्या. टोमॅटोमध्ये असलेले लायकोपीन सनबर्न, टॅनिंग कमी करण्यास मदत करते.

काळवंडलेली त्वचा स्वच्छ करण्यासाठी टोमॅटोच्या रसात कॉफी पावडर मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर तयार केलेले मिश्रण लावा. त्यानंतर हलक्या हाताने ५ मिनिट मसाज करा.

मसाज केल्यामुळे त्वचेवर जमा झालेली डेड स्किन नष्ट होण्यास मदत होईल आणि त्वचा आतून स्वच्छ होईल. कॉफीमध्ये असणारे नायट्रस ऑक्साईड त्वचेला फ्रेश, टवटवीत ठेवण्यास मदत करतात.

टोमॅटोचे मिश्रण ५ मिनिटं चेहऱ्यावर ठेवून नंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून टाका. यामुळे त्वचेच्या समस्या कमी होतील आणि सणावारांच्या दिवसांमध्ये त्वचा उजळदार दिसेल.






