यंदाच्या वर्षी वटपौर्णिमेला कानात घाला सोन्याची सुंदर बुगडी
पूर्वीच्या काळी महिला कानात बुगड्या देखील परिधान करायच्या. सर्वच महिला आवडीने कोल्हापुरी बुगडी परिधान करतात. बारीक बारीक नाजूमण्यांची गुंफण करून तयार केलेल्या बुगड्या कानात अतिशय सुंदर दिसतात.
मोराच्या किंवा मोत्याच्या डिझाईनमधील बुगड्या महिलांना खूप आवडतात. नऊवारी किंवा सहावारी साडी नेसल्यानंतर तुम्ही कानात मोत्याच्या बुगड्या घालू शकता.
गळ्यात सोन्याचे किंवा टेम्पल ज्वेलरी परिधान केल्यानंतर तुम्ही या डिझाईन्सच्या बुगड्या घालू शकता. या डिझाईन्सच्या बुगड्या कानात अतिशय सुंदर दिसतात.
रोजच्या वापरात काहींना बुगड्या घालायला खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही १ ग्रॅम सोन्यामध्ये सुंदर डायमंड असलेल्या बुगड्या बनवून घेऊ शकता.
हल्ली बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईन्सच्या ऑक्सिडाइज बुगड्या उपलब्ध आहेत. या बुगड्या कानात घालण्यानंतर पारंपरिक लुक देतात.