हिंदू धर्मात सर्वच सणांना विशेष महत्व आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये घरातील देवतांची पूजा केली जाते. याशिवाय दिवाळीमध्ये येणाऱ्या लक्ष्मीपूजेला घरातील लक्ष्मीची पूजा केली जाते. सणांच्या दिवशी सर्वच महिला पैठणी साडी नेसण्यास प्राधान्य देतात. सुंदर साडी नेसून तयार झाल्यानंतर साडीला मॅच होतील असे पारंपरिक दागिने सुद्धा परिधान केले जातात. आज आम्ही तुम्हाला पैठणी साडीवर कोणते पारंपरिक दागिने परिधान करू शकता, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. पारंपरिक दागिने सणांची शोभा वाढवतात. याशिवाय लुकसुद्धा अतिशय सुंदर दिसतो. (फोटो सौजन्य – pinterest)
लक्ष्मी पूजनाला आकर्षक पैठणीवर परिधान करा 'हे' पारंपरिक दागिने
पैठणी साडीवर तुम्ही ठुशी दागिना परिधान करू शकता. नाजूक साजूक बारीक मण्यांची ठुशी कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर दिसते. ठुशी तयार करताना सोन्याच्या मण्यांचा वापर केला जातो.
साडी नेसल्यानंतर आवर्जून घातला जाणारा दागिना म्हणजे मोत्याच्या मण्यांची नथ. मोत्याची पारंपरिक नथ कोणत्याही साडीवर आकर्षक दिसते. बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईनच्या नथ उपलब्ध आहेत.
हल्लीच्या मॉर्डन युगात लेटेस्ट दागिने परिधान करण्याऐवजी महिला पारंपरिक आणि मराठमोळ्या दागिन्यांची निवड करतात. पुतळी हार पूर्वीच्या काळी सर्वच महिलांच्या गळ्यात असायचा.
कोल्हापूरची शान असलेला कोल्हापुरी साज नऊवारी साडीवर अतिशय उठावदार दिसतो. कोल्हापुरी साजमध्ये अनेक वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत.
हातांची शोभा वाढवण्यासाठी हातामध्ये बांगड्या घातल्या जातात. कडे किंवा गहू तोडे हातामध्ये घातल्यास रॉयल आणि पारंपरिक लुक दिसतो.