राज्यात दिवसेंदिवस मतदान यादीचा घोळ वाढतचं चाललायं..कोल्हापूर जिल्ह्यातील कागल नगरपरिषदेच्या प्रारुप मतदार यादीत देखील घोळ झाल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे यांनी केलायं..कागल नगरपरिषदेच्या प्रारूप मतदार यादीबद्दल समरजित घाटगे यांनी आक्षेप घेतलायं..शिवाय त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून आक्षेप नोंदवला आहे.. कागल नगरपालिकेच्या प्रारुप मतदार यादी करताना सीईओ आणि बीएलओंनी चुकीचा कारभार केला आहे.. प्रभाग क्रमांक दहाच्या मतदार यादीतून 342 मतदार गायब झाल्याचं घाटगे यांनी म्हटलंय..तर संपूर्ण मतदार यादीमध्ये तब्बल 822 नावे दुबार असून शहरातील 458 मतदार मृत असताना मतदारांची नावे कमी झाली नसल्याचं समरजित घाटगे यांनी सांगितलंय..तसचं एका घरामध्ये केवळ सहा जण राहत असताना त्याच घरामध्ये तब्बल 36 मतदारांची नोंद करण्यात आल्याच समरजीतसिंह घाटगे यांनी स्पष्ट केलं आहे..