Tech Tips: ChatGPT च्या नावामागचं ‘सिक्रेट’ काय? GPT चा फुल फॉर्म नक्की आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर
कोणत्याही विषयावरील माहिती शोधण्यापासून आपला फोटो एडीट करण्यापर्यंत ChatGPT सर्व कामात मदत करतो.
ChatGPT च्या नावात असलेल्या GPT चा फुल फॉर्म तुम्हाला माहिती आहे का? आज सुमारे 90 टक्के लोकं ChatGPT चा वापर करत असली तरी देखील त्यांना GPT चा फुल फॉर्म माहिती नाही.
GPT चा अर्थ Generative Pre-trained Transformer असा आहे. हे तीन शब्द या तंत्रज्ञानाची खरी शक्ती परिभाषित करतात.
आज AI च्या क्षेत्रात GPT मॉडेल्स वर्चस्व गाजवत आहेत. हे मॉडेल्स मानवासारखे विचार आणि अभिव्यक्ती प्रदर्शित करतात.
जीपीटी आर्किटेक्चर आता फक्त भाषेपुरते मर्यादित राहिलेले नाही. आज, त्याच्या नवीन पिढ्या मल्टीमॉडल एआयमध्ये विकसित होत आहेत.